हिवरा बुद्रुक : डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरा बुद्रुक येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना उत्साहात पार पडली. सर्व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघाच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी सतीश लक्ष्मणराव गावंडे, उपाध्यक्षपदी भूषण प्रदीप आप्पाजी कुऱ्हेकर, सचिवपदी पंकजकुमार ठोंबरे (सर )तर कोषाध्यक्षपदी शेषराव सिताराम जाधव व सल्लागार सदस्यपदी श्री प्रल्हाद बंडूजी इंगोले (सर) यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे कार्यवाही व संचलन श्री संदीप थोंबे (सर) यांनी केले.नवीन पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेमुळे शाळा आणि माजी विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ होऊन विविध उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.





Social Plugin