Ticker

6/recent/ticker-posts

अंबड नगर परिषद निवडणूक २०२५ छाननी प्रक्रियेला मोठा प्रतिसाद

१२ नगराध्यक्ष तर ११६ नगरसेवक उमेदवार वैध २५ नोव्हेंबरपर्यंत अपील २६ ला चिन्हवाटप

अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

 अंबड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या छाननी प्रक्रियेला आज दि.१८ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्सुकतेत आणि पारदर्शक वातावरणात तहसील कार्यालयात सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या छाननीअंती थेट नगराध्यक्ष पदासाठी १२ उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ११६ उमेदवार वैध ठरले आहेत.

सकाळी ११ वाजता निवडणूक निरीक्षक विजय राऊत,उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज उर्किडे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनीही छाननी कक्षाला भेट देत संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली.वैध अवैध उमेदवारीचे चित्र नगराध्यक्ष पद  १२ उमेदवार वैद्य प्रभाग १ ते ११ : ११६ नगरसेवक उमेदवार वैध ३ उमेदवार अवैध Form A & B मूळ स्वरूपात/वेळेत न सादर केल्याने प्रभाग ८-अ, ९-ब आणि १०-अ मधील प्रत्येकी एक आगामी निवडणूक कार्यक्रम जाहीर उमेदवारी मागे घेणे 

१९ ते २१ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंतवैध उमेदवारांना या कालावधीत आपली उमेदवारी मागे घेण्याची संधी.अपील कालावधी २५ नोव्हेंबर २०२५ मंगळवार पर्यंत छाननीतील निर्णयाविरोधात इच्छुकांना अपील दाखल करण्याची मुदत.

चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर २०२५ बुधवार अपील प्रक्रिया संपल्यानंतर अंतिम रिंगणातील उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप.महत्त्वाची सुचना सर्व वैध ठरलेल्या उमेदवारांनी—

मतपत्रिकेसाठी दोन रंगीत पासपोर्ट फोटो निवडणूक खर्च नोंदवही संदर्भातील कागदपत्रे

लवकरात लवकर तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत जमा करावीत.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विजय चव्हाण यांचे आवाहन सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांनी वेळापत्रकाची काटेकोरपणे नोंद ठेवावी आणि नियमानुसार कार्यवाही करावी.