Ticker

6/recent/ticker-posts

बचत गटांना कर्जवाटपास दिलेल्या दीड कोटीचे परस्पर 'फिक्स डिपॉझिट'.

 



सिल्लोड प्रतिनिधी  आकाश कोके 

सिल्लोड तालुक्यातील अंधारी व पालोद येथील महिला प्रभाग संघाच्या नावाने ग्रामीण भागात बचत गटांना कर्ज वितरित करण्यासाठी शासनाने वर्ग केलेला १ कोटी ६० लाखांचा निधी प्रभाग संघाची परवानगी न घेताच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे तालुका अभियान व्यवस्थापक व एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक यांनी परस्पर एचडीएफसी बँकेत त्याच प्रभागाच्या नावाने 'फिक्स डिपॉझिट' केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अंधारी येथील जिजामाता महिला प्रभाग संघाच्या सिल्लोड येथील एचडीएफसी (खाते क्रमांक ५०१००५२३०३६१३०) बँकेच्या खात्यातून १ कोटी २० लाख व पालोद येथील स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघाच्या एचडीएफसी शाखा, सिल्लोड या (खाते क्रमांक ५०१००६५४६८२९४६) बँकेच्या खात्यातून ४० लाख रुपये असे एकूण १ कोटी ६० लाख रुपये परस्पर फिक्स करण्यात आले. व्याजाची रक्कम परस्पर हडप करण्याच्या उद्देशाने संघाच्या नावाने फिक्स डिपॉझिट केल्याचा आरोप प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. हा निधी जवळपास ६ महिन्यांपासून प्रभाग

#_सव्वाकोटी गायब
ग्रामीण भागात १० ग्रामसंघ (बचत गटांना) कर्ज वाटप करण्यासाठी पैसे काढायला बँकेत गेले असता आमच्या खात्यातील तब्बल १ कोटी २० लाख आम्हाला गायब दिसले. त्याची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला, अशी माहिती अंधारी येथील जिजामाता महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा रेखा माणकापे यांनी 'लोकमत'ला दिली. आम्ही शासनाकडे तक्रार करणार आहोत. दोषीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

"चालू खात्याला २ टक्के व्याज मिळते. फिक्स डिपॉझिटवर जास्त व्याज मिळावे, म्हणून मी बँकेला पत्र दिले होते. व्याज संघालाच मिळणार होते. त्यात भी कोणताही अपहार केला ना ही
संदीप कापसे, व्यवस्थापक

चूक झाली...

बँकेला अभियानच्या तालुका व्यवस्थापकांनी फिक्स डिपॉझिट करण्याचे पत्र १३ ऑक्टोबरला दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून मी फिक्स डिपॉझिट केले. प्रभाग संघाचा ठराव व परवानगीचे पत्र मी नंतर देतो, असे ते म्हटले होते. त्यांच्यावर मी विश्वास ठेवला; पण त्यांनी ठराव अद्याप दिला नाही.

सयद सर्फराज, बँक मॅनेजर, एचडीएफसी बँक, सिल्लोड