Ticker

6/recent/ticker-posts

आज स्व.मधुकरराव पिचड यांचं प्रथम पुण्यस्मरण.



राजूर / प्रकाश परते

स्व. वंदनीय मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनास जवळपास एक वर्ष पूर्ण होत असून त्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा गुरुवार, दि. २७नोव्हेंबर २०२५ रोजी राजूर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा मा. मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विधीपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आदरांजली वाहावी, असे नम्र आवाहन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, या प्रसंगी मुक्ताईनगर (जळगाव) येथील हभप विशाल महाराज खोले यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. श्रद्धा-भक्तीचा माहोल लाभावा आणि पिचड साहेबांच्या कार्याची प्रेरणा नवीन पोहोचावी, पिढीपर्यंत हा या आयोजनामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच वंदनीय पिचड साहेब यांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम सुरू आहे. या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही वैभवराव पिचड यांनी यावेळी दिली.