गणेश गावडे-पाटस प्रतिनिधी
पाटस गावचे उपसरपंच विकास कोळपे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर बुधवारी दि. २६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच इंदुमती शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी बाबासाहेब कोळेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निवडणूक सहाय्यक म्हणून ग्रामपंचायत अधिकारी तात्यासाहेब काळे यांनी काम पाहिले यावेळी माजी सरपंच योगेंद्र (बाबा) शितोळे,अरुण (मामा) भागवत,माजी सरपंच संभाजी खडके आदी मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin