मुऱ्हा जातीच्या १० महिन्याच्या रेडीवर हल्ला करून ठार केले .
पुसेगाव दि . [ प्रतिनिधी ]
खटाव तालुक्यातील राजापूर येथील सातपुता वस्तीतील सरंबाय परिसरातील शेतकरी उमाजी सोनबा मदने यांच्या गोठ्यावर रात्री बिबट्याने हल्ला करून मुऱ्हा जातीच्या १० महिन्याच्या रेडीवर हल्ला करून ठार केले . .
यासंदर्भात माहिती अशी , गेल्या दोन तीन महिन्यापासून राजापूर येथील जानुबाई खिंड ते कुळकजाई घाटमाथा, खोकडे ,आवळेपठार येथे जंगल व डोंगर परिसर पसरला आहे . येथील बहुसंख्य शेतकरी हे गाई ,गुरे शेळ्या ,मेंढया चरायीचे काम करतात. अलीकडच्या दोन तीन महिन्यापासून दिवसा तसेंच रात्री अपरात्री बिबट्याचे हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे .त्यामुळे या परिसरातील शेतकरी दहशतीत आहे. तरी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वनविभागाला केली आहे.
त्या संदर्भात मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात लवकरच मोठे जन आंदोलन केले जाईल , असा इशारा राजापुरचे सामाजीक कार्यकर्ते अजित दिडके यांनी दिला आहे .





Social Plugin