Ticker

6/recent/ticker-posts

आयशरची दुचाकीला धडक एक ठार, एक जखमी .



जिवन मावस

गंगापुर - (दि.२६)ढोरेगाव वरून छ. संभाजीनगर कडे लग्नकार्यास जात असताना जिकठाण फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणारा आयशर क्रमांक (एम एच २० सि टी ०८४३) याने दुचाकी क्रमांक (एम एच २० डी यु ०५४१) याला जोराची धडक दिली. यात दुचाकी वर पेंडापूर ता. गंगापुर येथील बाबू सिंग मेहेर(वय ४५) हा जागेवर ठार झाला तर त्यांची मुलगी आचल (वय १३) ही किरकोळ जखमी झाली.

या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक, शुभम वाघमारे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण अपघात एवढा गंभीर होता की, बाबू सिंग मेहेर हे जागेवरच ठार झाले. या घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास वाळूज ग्रामीण पोलीस करत आहेत.