कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
जालना: लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या आनंदो प्लस उपक्रमांतर्गत जालना विभागाच्या टास्क फोर्स टीमतर्फे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाटूर येथे टास्क फोर्स प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या प्रशिक्षणात विभागातील पाच केंद्रांतील गोल्डन व डायमंड टास्क फोर्स सदस्यांनी सहभाग नोंदवला. एकूण ५७ उत्साही स्वयंसेवकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.
या प्रशिक्षणाचा उद्देश टास्क फोर्सचे बळकटीकरण, नेटवर्किंग, संसाधन व्यवस्थापन आणि समाजविकासासाठी तरुणांना नेतृत्वक्षम बनविणे असा होता.
कार्यक्रमात कु. आर्या राऊत (आनंदो प्लस समन्वयक) यांनी ‘व्यक्तिगत आणि व्यावसायिक विकास’ या विषयावर प्रेरीत करणारे मार्गदर्शन केले व वैयक्तिक विकास टास्क फोर्सच्या ध्येयाशी जोडण्याचे आवाहन केले.
सौ. श्रुती मालगुंडकर (व्यवस्थापक, अनंदो प्लस) यांनी ‘संस्था उभारणी व संसाधन व्यवस्थापन’ या विषयावर प्रभावी सत्र घेतले आणि संघभावना तसेच साधनांचा योग्य वापर यांवर भर दिला.
कु. आर्या राऊत यांनी पुढील सहा महिन्यांसाठीची कृती योजना सादर करत प्रादेशिक टीमच्या कार्याचे कौतुक केले. तर श्री. जोमा मस्ती (वरिष्ठ अधिकारी जालना विभाग ) यांनी स्वयंसेवकांच्या कार्याची प्रशंसा करत सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने कार्य करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षणात सहाय्यक समन्वयक श्री. जगदीश सातपुते व श्री. प्रविण धाड यांचा देखील महत्त्वपूर्ण सहभाग होता.
कार्यक्रमासाठी विनामूल्य सभागृह व ध्वनीप्रणाली उपलब्ध करून देण्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाटूर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
उत्साह, शिस्तबद्ध नियोजन व उत्तम समन्वयामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. आनंदो प्लस अंतर्गत युवकांनी सामाजिक नेतृत्वाकडे टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले.





Social Plugin