सुरक्षारक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाइकांची मागणी
भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील
भोकरदन मध्यवर्ती बसस्थानक येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्का दायक घटना घडली या बाबत मिळालेली माहिती अशी की भोकरदन येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे मंगळवारी रोजी दिनांक 4, नोव्हेंबर दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मध्यवर्ती बसस्थानक येथील महीला शौचालय कडे
माजीत खा अन्वरखा राहणार कठोरा बाजार वय वर्षे 60 हे भोकरदन बसस्थानकावरील महीला शौचालय कडे गेले होते.त्यावरुन सुरक्षारक्षक सुरेश गणपत वनारसे रा.फत्तेपूर यांनी काठीने बेदम मारहाण केली. जखमी झालेल्या माजीत खा अन्वरखा यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . परंतु त्यांना अधिक उपचारासाठी भोकरदन हुन सिल्लोड येथे नेत असताना मार्गावर च माजीत खा यांचा मृत्यू झाला . माजीत खा यांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी भोकरदन पोलिस ठाण्यात जमा होत गोंधळ घातला. आणि सुरक्षा रक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी केली.पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत घटना स्थळी भेट देऊन सुरक्षा रक्षक सुरेशं गणपत वनारसे ला ताब्यात घेतले.सुरक्षा रक्षका कडुन झालेल्या बेदम मारहाण मुळेच माजीत खाचां मृत्यू झाला असुन सुरक्षारक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी भोकरदन पोलीसांकडे केली आहे.दरम्यान भोकरदन पोलिसांनी सुरक्षा रक्षक सुरेशं गणपत वनारसे यांना ताब्यात घेतले असुन भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.नितिन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण ,पोलिस उपनिरीक्षक पवन राजपुत हे अधिक तपास करीत आहेत.पोलीस उपनिरीक्षक पवन राजपुत यांनी घटनास्थळी भेट दिली असुन या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.




Social Plugin