Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद प्रशाला कोठा कोळी येथे पालक मेळावा व शालेय व्यवस्थापन समितीची बैठक

 


प्रतिनिधी: निरंजन बावस्कर 

भोकरदन: कोठा कोळी येथील जिल्हा परिषद शाळा येथे पालक मेळावा व शालेय व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली.

              याप्रसंगी माजी विद्यार्थी प्राचार्य अंकुश माणिकराव सोनवणे यांनी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून मुलांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित केले व जेवणाची व्यवस्था केली. तसेच शाळा कलरिंग करण्यासाठी मानधन दिले. 

यावेळी केंद्रप्रमुख, शाळेतील शिक्षक वृंद, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.