महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी
पिंपळखुटा परिसरात विहिरीच्या पाण्यावर लागवड केलेला हरभरा आणि गहू पोषक वातावरणामुळे चांगलाच बहरला असून वन्य प्राण्यांच्या त्रासातून आपले किमती पिक वाचवण्यासाठी शेतकरी रात्री बे रात्री जागते रहो चा गजर देत आहेत..
पिंपळखुटा भाग 1 आणि पिंपळखुटा भाग 2 या दोन्ही भागात अनुक्रमे उतावळी आणि मन प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याने कालव्याखालील ओलीत क्षेत्रात वाढ होणार असून येत्या डिसेंबर महिन्यात दोन्ही भागात ओलिताखालील गहू, भुईमूग, कांदा आदी रब्बी आणि उन्हाळी पिके घेतली जाणार आहेत. पिंपळखुटा हे गाव अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले असून मन आणि उतावळी प्रकल्प हे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. या दोन्ही प्रकल्पामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न साकार होणार असून निसर्गाने साथ दिल्यास खरिपात झालेले नुकसान काही अंशी भरून निघण्याची शक्यता आहे.





Social Plugin