अनिलराव कोल्हे यांनी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक अर्ज आमदार हिकमतदादा उढाण यांच्याकडे सादर
कैलास कोल्हे @ग्रामीण प्रतिनिधी
गुरु पिंपरी: जिल्हा परिषद गुरूपिंपरी सर्कलमधून श्री. अनिलराव कोल्हे यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज आमदार हिकमतदादा उढाण यांच्याकडे सादर केला.
या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री. कोल्हे यांनी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “ग्रामविकास, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य असेल.”
गुरूपिंपरी जिल्हा परिषद सर्कल मधुन उमेदवारी मिळाल्यास मोठ्या ताकतिने लढणार व विजय होणार अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गावच्या ग्रामपंचायत सदस्यांन पासुन सुरूवात करून त्यांनी उपसरपंच पद ही भुषवलेले आहे, त्याचा जिल्हा परिषद सर्कल मध्ये मोठा संपर्क आहे. गोर गरीब जनतेचा मदती साठी ते सदैव तत्पर असतात. या वर्षी काही ही करून आम्ही उमेदवारी मिळाल्यास निवडणूक येणारच असे त्यांनी सांगितले. उमेदवारी मिळाल्यास जनतेच्या विश्वासास आम्ही पात्र ठरू असे त्यांनी ठाम पणे सांगितले. या प्रसंगी गावातील व जिल्हा परिषद सर्कल मधील मोठ्या प्रमाणात ग्रामस्थउपस्थित होते.





Social Plugin