बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
खटाव तालुक्यातील खातगुण येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उघड्यावर शौचालयास बसणा-या शिक्षक श्री जावेद शेख यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक गणेश भोसले यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की , खातगुण येथील जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक श्री जावेद शेख यांनी शाळेच्या वेळेत शाळेच्या आवारात उघड्यावर शौचास बसले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
जिथे लहान मुलांचे भविष्य घडविले जाते अशा ठिकाणी जावेद शेख यांनी घृणास्पद कृत्य केले असून त्या शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अन्यथा कार्यवाही संबंधित व्यक्तीवर न केल्यास संघटनेमार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन आपल्या पंचायत समिती वडूज या आवारात करण्यात येईल .यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित शिक्षक व प्रशासन जबाबदार राहील . हे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी खटाव ता. नेते, खादी ग्रामोद्योग वडुज संचालक गणेश भोसले, पँथर ग्रुप अध्यक्ष भगवान मोरे, संदीप काळे ,जेष्ठ नेते सुनिल मिसाळ, गणेश यादव, प्रमोद शिंदे, संतोष शिंदे, संदीप देशमुख सहकारी उपस्थित होते.





Social Plugin