प्रतिनिधी अर्धापूर/विश्वराज वाकोडे
कुसळवाडी जननायक बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभर ‘जनजातीय गौरव पंधरवडा’ उत्साहात साजरा केलाआहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून कुसळवाडी येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी, मुख्याध्यापक श्रीरामे सर, नागरगोजे सर, तसेच गावाचे सरपंच श्रीरंग देशमुखे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील कचरा उचलणे,झाडाझाडोरा साफ करणे,प्लास्टिक गोळा करणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे अशी कामे केली. ग्रामस्थांमध्ये “स्वच्छ गाव सुंदर गाव” हा संदेश* पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
सरपंच श्रीरंग देशमुखे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले की,बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या संघर्षशील आणि प्रेरणादायी आयुष्याचा आदर्श घेत सामुदायिक कार्यात सक्रिय सहभाग वाढवणे हीच खरी त्यांना आदरांजली आहे.
विद्यार्थ्यांना स्वच् उत्तरदायित्व वाढत असल्याच गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेश डुकरे,दिपक धुमाळे व नवयुवक तरुण यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.या स्वच्छता अभियानामुळे मंदिर परिसर नवचैतन्याने निघाला आणि ग्रामस्थांनी उपक्रमाचे स्वागत केले.





Social Plugin