सोनपेठ (प्रतिनिधी) :- शिवशंकर तुपकर
श्री नंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री आद्यमठाध्यक्ष तपस्वी श्री गुरु नंदिकेश्वर शिवयोगी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सव व चरपट्टाधिकारी श्री.ष.ब्र.108 गुरुवर्य नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या 25 वा वर्धापन दिन सोहळा निमित्त अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परमरहस्य पारायण, शिवदीक्षा संस्कार व दीपोत्सव, प्रारंभ कार्तिक कृ.10 शुक्रवार दिनांक 14/11/2025 प्रारंभ करण्यात आला, यावेळी प्रमुख उपस्थिती सुभाष आप्पा नित्रुडकर, विनोद चिमणगुंडे, माणिक आप्पा निलंगे रामेश्वर महाजन, बसलीगाप्पा मोडीवाले, जगदीश आप्पा बुरांडे, गुरुनाथ मेहत्रे, सुरेश अप्पा पोपडे, डॉ.सिद्धेश्वर हालगे, नंदकुमार स्वामी, संपादक किरण स्वामी, मोहन खोडवे, रमेश झंवर, केदारलिंग स्वामी, सदाशिव आप्पा कोल्हेकर, ह भ प प्रा. विठ्ठल जायभाये, उमाकांत आप्पा कोल्हेकर,धुळाप्पा जमशेटे,कोंडीबा एकलारे, सदाशिव राजमाने, नागनाथ कोठुळे, सोमनाथ दळवे, प्रकाश जमशेटे, डॉ.मन्मथ महाजन, नंदकिशोर पोपडे, सिद्धलिंग आप्पा धुमाळ अध्यक्ष सप्ताह कमिटी आदींच्या प्रमुख उपस्थितीत श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पाद्य पूजा, मंत्रोक्त पूजा, दीप प्रज्वलन, ध्वज पूजा, विना पूजन, ग्रंथ पूजा, टाळ व मृदंग पूजन करण्यात आले
यावेळी मनोगत ह भ प प्रा. विठ्ठल जायभाये यांनी व्यक्त केले, श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वचनाने अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथराज परमरहस्य पारायणास सुरुवात शिवभक्त पंडित त्रंबक महाराज हासेगाव, शिवभक्त पंडित भुजंग आप्पा पळसकर व शिवभक्त पंडित प्रा.करबस आप्पा पोपडे यांच्या वतीने सुरुवात करण्यात आली. दैनंदिन कार्यक्रम सकाळी 7 ते 8 श्री नंदिकेश्वर संजीवन समाधीस रुद्राभिषेक, 8 ते 11 परमरहस्य पारायण, 11 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 महाप्रसाद, 2 ते 4 संगीतमय शिवकथा, 8 ते 10 शिवकिर्तन, 10 ते 11 प्रसाद, 11 ते 4 शिवजागर व पहाटे 4 ते 6 शिवपाठ व काकड आरती होणार आहे, विशेष मंगळवार दिनांक 18/11/2025 सकाळी 8 ते 10 धर्मलिंगार्चत्मक वीरशैव जंगम पुरोहित संस्था परभणी यांच्या वतीने संजीवन समाधीस रुद्राभिषेक, सायंकाळी 6 ते 8 श्री गुरु ष.ब्र.108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांचा 25 वा पट्टाभिषेक वर्धापन सोहळा, बुधवार दिनांक 19/11/2025 सकाळी 10 ते 12 शिवदिक्षा , सायंकाळी 7 वाजता आद्यमठाध्यक्ष तपस्वी श्रीगुरु नंदिकेश्वर शिवयोगी संजीवन समाधी स्थळी दीपोत्सव संपन्न होणार आहे, गुरुवार दिनांक 20/11/2025 सकाळी 8 ते 11 पर्यंत ग्रंथराज परमरहस्य व उपस्थित गुरुवर्य शिवाचार्य महाराज यांची भव्य शोभायात्रा सोनपेठ नगरीतून मिरवणूक संपन्न होईल,तरी उपरोक्त सर्व कार्यक्रमाचा शिवभक्तांनी आनंद घ्यावा असे आवाहन श्री नंदिकेश्वर महाराज भक्त मंडळी, समस्त वीरशैव लिंगायत शिष्यगण व ग्रामस्थ बांधवांनी केले आहे.





Social Plugin