Ticker

6/recent/ticker-posts

शासनाने 155 च्या सात बारा उतारे दुरुस्तीची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावी सोनिया राजदेव .

        


पारनेर प्रतिनिधी भानुदास

   शासनाने अनेक वर्षांपासून 155 प्रमाणे दुरुस्तीची प्रकरणे मंडलाधिकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत ,अद्याप त्यावर काही कार्यवाही झालेली नाही ती लवकरात लवकर मार्गी लावावीत असे पत्र तहसीलदार यांना सोनिया राजदेव यांनी दिले आहे .

         सरकारी दप्तर ऑनलाइन करण्यात आले त्यावेळी तलाठ्याने केलेल्या चुका ऑनलाइन दुरुस्त करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज आलेले आहेत ,कित्तेक दिवस त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही तरी 155 दुरुस्तीची आदेश असताना ही तलाठी आणि सर्कल काहीच कार्यवाही करत नाही त्यावर कार्यवाही करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा सातबारा दुरुस्त करण्यात यावा.

        अन्यथा आम्ही रेशनकार्ड संदर्भात जे आंदोलन होणार आहे त्यात हा मुद्दा घेऊन उग्र रूप धारण होईल याची नोंद घ्यावी .