महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी
पिंपळखुटा गावात माकडांनी हौदोष घातल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून माकडाचा बंदोबस्त लावण्याची मागणी त्रस्त लोकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील लोक शेतीतील कामे आणि रोजंदारीसाठी घराबाहेर पडल्यानंतर माकडे घरावर उड्या मारत हौदोष घालत असून घरावर वाळू घातलेले धान्य फस्त करीत आहेत. घरी असलेल्या स्त्रियांना सदर माकडे घाबरत नसून वेळप्रसंगी हल्ला करण्याची देखील त्यांची तयारी आहे. त्यामुळे नुकसान होऊनही माकडांना पिटाळून लावण्यास स्त्रिया असमर्थ ठरत असून वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग आलेगाव यांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता माकडाचा बंदोबस्त केला पाहिजेत.





Social Plugin