Ticker

6/recent/ticker-posts

झील इंटरनॅशनल स्कूल कारंजा येथे तालुकास्तरीय कब बुलबुल उत्सव उत्साहात संपन



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

      तालुकास्तरीय कब बुलबुल उत्सव दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी झील इंटरनॅशनल स्कूल कारंजा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे उद्घाटन झील इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक के एल पवार, मुख्याध्यापिका कुमारी अभिलाषा बासुळे, रेखा कापुरे, काजल पवार, मोहम्मद इक्तेखार हुसेन, विठ्ठल भुसारे, ज्येष्ठ स्काऊट मास्टर गोपाल काकड, श्रीकांत देशपांडे, प्रशांत इंगळे निलेश मिसाळ, प्रीता भोंगाडे इत्यादींची उपस्थिती होती.

    उद्घाटनानंतर उत्सवातील सामूहिक लोकनृत्य, दोरीवरच्या उड्या, पोता शर्यत, बटाटा रेस, तीन टांगी शर्यत आदी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.सर्व पात्र स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. 

      या उत्सवामध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनखेड, पसरणी, वढवी कामठवाडा, गायवळ काजळेश्वर, रा ल न प कन्या शाळा कारंजा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा कारंजा, कंकुबाई कन्या प्राथमिक शाळा कारंजा, विद्यारंभ स्कूल कारंजा, श्री म ब्र आश्रम प्राथमिक शाळा कारंजा, झील इंटरनॅशनल स्कूल कारंजा, श्री समंतभद्र प्राथमिक शाळा कारंजा, डॉ.अल्लामा इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा कारंजा, वेदांत पब्लिक स्कूल पोहा, जि प प्रा कन्या शाळा उंबर्डा, जि प उर्दू प्राथमिक शाळा काजळेश्वर इत्यादी शाळेतील 140 पेक्षा जास्त कब बुलबुल विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कब मास्टर निलेश मिसाळ यांनी, प्रस्तावना के एल पवार यांनी तर आभार गोपाल काकड यांनी मानले. 

       या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कब मास्टर / फ्लॉक लीडर कुमारी कांता बंड, सुशीलकुमार राठोड, संजय राठोड, सौ प्रीता भोंगाडे, प्रशांत इंगळे, कुमारी सोनल काकड, प्रशांत कापसे, संगीता ठाकरे, प्रवीण गवई, कुणाल यंबल, अतिक अहेमद, मयूर वडते, कुमारी मनीषा जगताप, कुमारी माधुरी उंदरे, एस एस धनगर, कुमारी पी बी अलोने, मोहम्मद राजिक, जी जी डुकरे, कार्यालयीन कर्मचारी रूपाली आरु, सदानंद शिरसाठ तसेच झील इंटरनॅशनल स्कूल कारंजा या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सहभागी शाळेचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले तसेच शाळेच्या वतीने सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून उत्सव यशस्वीतेसाठी सहकार्य केले. गटशिक्षणाधिकारी कार्यालय कारंजा च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना नाश्त्याचे व्यवस्था करण्यात आली.