Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय महामार्ग 848 पाहणी करतांना मंत्री माननीय नरहरी झिरवाळ साहेब.

 


महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी : संजय भोये  पेठ 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वरील सावळ व कोटंबी घाट परिसरात अपघातस्थळी मंत्री महोदय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांनी पाहणी केली.. पर्यायी मार्ग व सुरक्षेच्या उपाययोजनांची तातडीची गरज ! नाशिक–पेठ–धर्मपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वरील सावळ घाट व कोटंबी घाट येथे रस्त्याच्या रुंदीकरण व दुरुस्तीची कामे प्रस्तावित असून, त्या अनुषंगाने सदर मार्ग सध्या पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.

काल पाहणीसाठी या ठिकाणी भेट दिली असता, मार्गावर एक अपघात घडल्याचे निदर्शनास आले. अपघातग्रस्त कंटेनरमध्ये “इथेनॉल” हे ज्वलनशील द्रव्य वाहून नेले जात होते. सदर कंटेनर हटविण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला.

या अपघातामुळे प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीस सामोरे जावे लागले. सद्यस्थितीत पर्यायी मार्गांची योग्य व्यवस्था करणे व आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे.