भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
कोण होणार नगराध्यक्ष?
*उमरेड :* शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ आणि सोबती या संस्थेच्या वतीने उमरेड येथे व 'कोण होणार नगराध्यक्ष' ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेच्या प्रविशिकेमध्ये एकूण तीन प्रश्न विचारले गेले असून, पर्यायी उत्तरांसमोर स्पर्धकांना खूण करावयाची आहे. नगराध्यक्ष कोण होणार,किती मतांच्या अंतराने विजयी होणार आणि कोणता पक्ष किती जागा जिंकणार, असे प्रश्नाचे स्वरूप आहे. १९ डिसेंबरपर्यंत स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. २७ डिसेंबरला या स्पर्धेचे पारितोषिक विवरण उमरेड फूड फेस्टिव्हलमध्ये केले जाईल.अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेला उमरेडकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.





Social Plugin