बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित अखिल भारतीय शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत आयएससी मालेगाव संघाने प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. या स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय व दिग्गज राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते.
सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगावात झालेल्या राज्यस्तरीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत ३५ संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील दोन्ही उपउपांत्य व उपांत्य फेरीतील सर्वच सामने रंगतदार झाले. अंतिम सामन्यात उपविजेत्या मनेराजुरी युथ फाउंडेशन, सांगली संघाला ३१ हजारांचे बक्षीस मिळाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेश अरुणकुमार शर्मा व्हॉलिबॉल संघाला तिसऱ्या क्रमांकाचे २१ हजार रुपये, तर क्रांती कुंडल शूटिंग बॉल संघाला चौथ्या क्रमांकाचे ११ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. पंजाब संघाला पाचवा, उत्तराखंड संघाला सहावा, जयंत खंडागळे माळशिरस संघाला सातवा, तर आमीर काझी माळशिरस संघाने आठवा क्रमांक पटकावला. क्रमांक पाच ते आठ या विजेत्या संघांना प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आले.
मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, व्हॉलिबाल कमिटीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
.jpg)




Social Plugin