Ticker

6/recent/ticker-posts

..आणि शेवटी घरकुल वासियांची घाणीच्या विळख्यातून सुटका



रूपेश मार्गे@ प्रतिनिधी 

 वाशिम येथील वार्ड क्रमांक १ मधील घरकुल मधे गेली कित्येक वर्ष सांडपाणी आणि कचऱ्याचा विळखा होता. तेथील रहिवाश्यांना चक्क नालीतून आणि कचऱ्यामधून रस्ता काढावा लागत होता. त्यामुळे कित्येक वेळा नालिसदृश्य पाण्यामुळे महिला आणि लहान मुले पडलेत आणि घाणी मुळे बिमारीचा सदैव वावर रहायचं, पण तेथील नेतेमंडळीनी त्याची दखल घेतली नाही आणि येऊन सुद्धा बघितल नाही.

पण नालंदा नगर येथील समाजसेविका तथा वज्रदेही महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा कु. आरतीताई ठोके यांनी याची लोकांच्या समस्येची दखल घेऊन स्वतः पुढाकार घेतला आणि प्रशासनाला हाताशी घेऊन सर्व सांडपाणी आणि कचऱ्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे परिसरातील नागरिक सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक करत आहेत. जे काम नेतेमंडळींना जमले नाही ते महिला शक्तीने करून दाखविले अशी प्रतिक्रिया तेथील नागरिकांमधून येत आहे.