गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य झोकून देणारी व्यक्तिमत्त्वे फारच विरळ असतात. त्यातही स्वतःच्या नावाचा गाजावाजा न करता, शांतपणे आणि सातत्याने समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणजे माननीय रामेश्वरभाऊ नाईक साहेब.सेवा, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो. गोदरी कुंभमेळ्याच्या माध्यमातून बंजारा समाजाची ओळख राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केले. विकासापासून कोसो दूर असलेल्या तांड्यांसाठी त्यांनी केवळ मागण्या मांडल्या नाहीत, तर त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला.
संत सेवालाल महाराज बंजारा–लबाणा तांडा समृद्धी योजना ही त्यांच्या प्रयत्नांची ठळक साक्ष आहे. या योजनेमुळे अनेक तांड्यांमध्ये पाणी, रस्ते, वीज, शिक्षण व मूलभूत सुविधांचा मार्ग खुला झाला.मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख म्हणून कार्य करताना त्यांनी हजारो गरजू कुटुंबांना आशेचा हात दिला. दुःखाच्या क्षणी आधार देणे, संकटात धावून जाणे आणि मदतीला प्रसिद्धीपेक्षा माणुसकीचे महत्त्व देणे—हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे.
इतिहास, संस्कृती व धर्मपरंपरेविषयीही त्यांची भूमिका तितकीच ठाम आहे. गुरु तेग बहादूरजी यांच्या महान बलिदानाशी निगडित असलेल्या लक्खीशहा बंजारा व मक्खनशहा यांच्या शौर्यगाथेला समाजासमोर आणण्याचे कार्य त्यांनी केले. विविध समाजांमध्ये गुरुबंधुत्वाची भावना दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न आज प्रेरणादायी ठरत आहे.
साधेपणा, प्रामाणिकपणा, संवादकौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती—हे रामेश्वर भाऊ नाईक साहेब यांचे खरे अलंकार आहेत. म्हणूनच ते केवळ एक पदाधिकारी नाहीत, तर बंजारा समाजाचा अभिमान, विश्वास आणि प्रेरणास्थान आहेत.





Social Plugin