किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधि
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य संगीतमय श्रीराम कथा व अखंड हरिनाम संकिर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हे सप्ताहाचे 5 वे वर्ष आहे या सप्ताहाचे आयोजन कन्हैया महाराज देवस्थान समिती (नवनाथ मंदिर)व समस्त गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या सप्ताहाचे ठिकाण नवनाथ मंदिर आहे या सप्ताहाचे कथावाचक स्वामी श्री जनार्दन हरिजी महाराज हे आहे. हा सप्ताह दिनांक 17 डिसेंबर 2025 ते दिनांक 24 डिसेंबर 2025 पर्यंत आहे .17 डिसेंबर 2025 रोजी कथा प्रारंभ होण्याच्या पहिले 10 ते 12 या वेळेत राम मंदिर ते नवनाथ मंदिर पर्यंत कलश यात्रा निघणार आहे.या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती सकाळी 5 ते 6,श्रीराम कथा दुपारी 1ते5,हरिपाठ संध्याकाळी 5.30ते6.30,हरि किर्तन रात्री 8ते10 असे आहेत.
या सप्ताह काळात वेगवेगळया किर्तनकारांचे किर्तन आहे दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.मनोहर देव महाराज अंतुर्ली यांचे किर्तन , दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.अमृतजी स्वामी महाराज बिड यांचे किर्तन, दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.अनिल महाराज पाटील बार्शी यांचे किर्तन, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.उल्हास महाराज सुर्यवंशी आळंदी देवाची यांचे किर्तन, दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.उमेश महाराज दशरथे आळंदी देवाची यांचे किर्तन, दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे किर्तन, दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प.कान्होबा महाराज देहुकर यांचे किर्तन असे दैनंदिन किर्तनाचे कार्यक्रम आहे. या सप्ताहासाठी साथ संगत मृदुंगाचार्य किरण महाराज धामंदे ,विशाल महाराज अलमपूर ,गायनाचार्य कृष्णा महाराज जरारे आळंदी दे , दिनेश महाराज बोरसे आळंदी देवाची असे आहेत या सप्ताहाचे काल्याचे किर्तन दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे मुक्ताईनगर यांचे 9 ते 11 या वेळेत आहे . तर महाप्रसाद 12 ते 4 या वेळेत व दिंडी सोहळा 5 ते 8 या वेळेत आहे .





Social Plugin