Ticker

6/recent/ticker-posts

आदमपुरात हरिनाम व भागवत कथामाला सप्ताह .



●ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथे शुक्रवार दि.२६  डिसेंबर पासून ४६ व्या अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेला प्रारंभ होत आहे. भागवताचार्य ह.भ.प.मधुसूदन महाराज कापशीकर 

यांच्या रसाळ वाणीतून नियमित दुपारी २ ते ५ प्रवचन ऐकता येणार आहे.समवेतगायक गंगाधर पाटील रूईकर, श्रीधर  महाराज घुंगराळा,ह.भ.प.योगेश महाराज सोन्ने संभाजीनगर, सिंथ वादक यादव महाराज बोळेगांव, 

तबला वादक बालाजी पाटील ईकळीमाळ,विणेकरी ह.भ.प.किरण महाराज पुंड परभणीकर, तालमुणी ह.भ.प.नारायण महाराज परभणी,झाँकीवाले बापू महाराज अमळनेरकर हे साथसंगत करणार आहेत. हा भक्तिरूपी सोहळा यशस्वी करण्यात सर्व गावकरी एकमनाने गुंतले आहेत.

येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा आदमपूर गाव परिसरात दरवर्षीप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण असते. दि.२६ डिसेंबर पासून क्रमाने ह.भ.प. व्यंकट महाराज एकलारकर, ह.भ.प.तुकाराम महाराज मंडगीकर, ह.भ.प.बाळासाहेब महाराज शिंदे जालना,ह.भ.प.भूषण महाराज तळणीकर, ह.भ.प.माधव गुरूजी वडगावे पांगरीकर, ह.भ.प.गुरूराज महाराज देगलूरकर, ह.भ.प. वैराग्यमूर्ती कागदे बापू उमरीकर, अखेर दि.२ जानेवारी रोजी ह.भ.प.अनिल महाराज तुपे नाशिक यांच्या उपस्थितीत काल्याचे किर्तन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.अनुक्रमे पद्मिणबाई बालाजी खंडगुळे, कै.वैजनाथ खंडगुळे,कै.दिगांबर चिगळे यांच्या स्मरणार्थ,दिपक कुंभारगावे,सुबेदार नागनाथ बासरे यांच्यावतीने भाविक भक्तगण आणि गावकऱ्यांना महाप्रसाद आयोजित केले आहे. फराळ व अन्नदाते म्हणून राजेंद्र शिंदे,उद्धव इंगळे,शिवाजी भुरे, गुणवंत इंगळे,गणेश इंगळे, माधव चिंतले,अंबादास शिनगारे,संतोष चिगळे,महेश भुरे, राम इंगळे,कै.दिगांबर चिगळे यांच्या स्मरणार्थ, गंगाधर घंटापल्ले,मोहन कासलवार,दिलीपराव महाजन,विठ्ठल इंगळे,मारोती कोकणे,गिरमाजी कोळनुरे आदी व्यवस्थापक सहभागी आहेत.

शुक्रवार दि.२ जानेवारी रोजी अखेर येथील सेवानिवृत्त आर्मी सुबेदार नागनाथ माणिकराव बासरे यांच्यावतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन घेऊन सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात येईल.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,दुपारी श्रीमद भागवत कथा,सायंकाळी हरिपाठ, हरि किर्तन राञी हरि जागर असा नित्यक्रम सुरू राहणार आहे.शिव,वैष्णव व दत्तपंती भजनी व काकडा,पारायण, जागर प्रमुख,गायनाचार्य,मृदंगाचार्य, विणेकरी आदि मंडळींचा विशेष सहभाग असणार आहे.गाव परिसरातील वैष्णव भक्तांनी सदरील भावभक्तीरूपी निर्गुण, निराकार सोहळ्याचा याचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त आदमपूर गावकरी मंडळींकडून करण्यात आले आहे.