Ticker

6/recent/ticker-posts

अटल क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह देऊन केले स्वागत.



जितेंद्र बहेकार . प्रतिनिधी

      "तुमच्या या पावलांची शिरोमणी झाली

      जिद्द उंच उंच उडण्याची ह्या रणी झाली

      यशोगाथा लिहावी विजेत्यां तुझीया

      स्वागत तुझा मुशाफिरा..

      सत्कार तुझा मुशाफिरा.."

साखरीटोला,सरत्या वर्षाचा शेवट अशा देदीप्यमान विजयाने मिळाला आणि जि. प. हाय. साखरीटोला येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अटल क्रीडा व सांस्कृतिक जिल्हा महोत्सवाचे बोंडगाव/देवी येथे होते. जिल्हास्तरावर उच्च माध्यमिक गट ९ते१२ कबड्डी मुली प्रथम पारितोषिक व माध्यमिक स्तर ६ते८ खो-खो व कबड्डी मुली दुसऱ्या क्रमांकाने विजयी ठरले. आणि वैयक्तिक गायन स्पर्धेत नंदनी दोनोडे दुसरा क्रमांक अशा सर्व विजेत्यांचा स्वागत व सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल साखरीटोला येथे उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षा म्हणून मा. श्रीमती वंदनाताई काळे, मा. डॉ. संजयजी देशमुख, श्री. मा. राजूजी काळे (सामाजिक कार्यकर्ता), मा. परदेशी सर (मुख्या. जि. प. हाय. साखरीटोला) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या उच्च माध्यमिक कबड्डी मुली रिया कोरे, भाग्यश्री हत्तीमारे, डिंपल कदम, भारती चर्जे, दीपशिखा बैस, निर्झरा वाढीवे, नीती कोरे, मिताली कोरे यांना प्रशस्तीपत्र, पदक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच माध्यमिक गटामध्ये मुली खो-खो व कबड्डी खेळामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या त्रिशा चुटे, पूर्वा चौधरी, नीलिमा फुन्ने, निराली दोनोडे, भाग्यश्री ठाकरे, खुशी बावनकर, गुंजन ब्राह्मणकर, रूपाली चुटे, जीविका ब्राह्मणकर यांना प्रशस्तीपत्र, पदक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविलेल्या नंदिनी दोनोडे हिला प्रशस्तीपत्र पदक व चषक देऊन गौरविण्यात आले.

 विविध स्पर्धेत जिल्हास्तरावरील विजेतेपद मिळविण्यासाठी सतत परिश्रम व मार्गदर्शन करणारे श्री पवार सर, श्री. थेर सर, श्री. कोडापे सर, श्रीमती खंडाइत मॅडम, श्रीमती बैस मॅडम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती वंदनाताई काळे यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीविषयी आनंद व्यक्त करून शाळेचा व गावाचा नाव जिल्हा पटलावर आल्याने समाधान व्यक्त केले व विजेत्या चमूंना  अनेक शुभेच्छा दिल्या. श्री. मान. परदेशी सर यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तुंग कामगिरीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन श्री. कटरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. कोडापे सर यांनी केले.व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.