नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या गावात प्रस्थापित असलेले, आणि सर्वात जुने तसेच नाशिक जिल्ह्याची शान म्हणून ओळखले जाणारे मिलन फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल या ठिकाणी यांच्या संचालकांनी एक आगळीवेगळी पद्धत आणि एक नवा उपक्रम राबवला .
नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी खरेदी करत असलेल्या लोकांना कसा लाभ होईल त्यांचा हाच प्रयत्न असतो , परंतु यावेळी त्यांनी या उपक्रमाने एक विशेष ओळख निर्माण केली.
आणि नाशिक सारख्या जिल्ह्यात नाव प्रस्थापित केले तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या बघितले तर हा उपक्रम लोकांच्या हितासाठी आणि आनंदासाठी खूप फायद्याचा ठरला, त्यांनी ०१ सप्टेंबर २०२५ पासून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एक लकी ड्रॉ ची स्कीम राबवली होती , त्यामध्ये सुमारे ९०० ते १००० लोकांनी सहभाग घेतला आणि आनंद घेतला.
यामध्ये सुमारे ५० ते १०० लोकांना मोफत बक्षिस वाटण्यात आली , त्यामध्ये एक फ्रिज , एक एलईडी टीव्ही , एक घरघंटी , दहा वॉशिंग मशीन , दोन कूलर , एक कपाट , एक ड्रेसिंग टेबल , १० होम थेटर , दहा गॅस शेगडी , दहा सीलिंग फॅन , आणि दहा इस्त्री असे जिंकणाऱ्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना दिले गेले. आणि इतर ग्राहकांना त्यांनी नाराज न करता प्रत्येक ग्राहकाला घेतलेल्या वस्तूवर एक भेट वस्तू म्हणजेच परतफेड म्हणून एक चांगली भेटवस्तू देण्यात आली. त्यामुळे या दुकानाचे चालक-मालक खलील पठाण यांचे नाव आणि मिलन मॉल या दुकानाचे नाव देखील सुरगाणा गावात तसेच नाशिक जिल्ह्यात खूप नावलौकिक होत आहे तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित मिलन मॉल चे सहसंचालक श्री. साकिब पठाण , श्री अफराज पठाण , तसेच नुरी हॉटेलचे संचालक श्री. अजिज पठाण, तसेच किशोर चव्हाण , श्री. रतन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता घेतली आणि असेच उपक्रम यापुढे आम्ही राबवणार आणि समाजाच्या चांगल्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारची योजना लागू करणार आणि जनतेसाठी जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणार असा मिलन मॉल चे चालक-मालक यांचा शब्द त्यांनी शपथ म्हणून सर्व आलेल्या पाहुण्यांना दिला.





Social Plugin