Ticker

6/recent/ticker-posts

बुध येथे ' शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन.



उद्यानदूतांचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बुध दि .(प्रकाश राजेघाटगे):

येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयातील उद्यानदूतांनी 'ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम' (RHWE) आणि 'कृषी औद्योगिक जोड २०२५-२६' अंतर्गत हा उपक्रम राबविला.

या स्पर्धेसाठी ' संगीत खुर्ची, लिंबू चमचा हे खेळ घेतले होते . शालेय विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन बुध  ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुजाता दत्तात्रय बोराटे. आणि उपसरपंच मा.अभयराजे उदयसिंह घाटगे .यांच्या हस्ते झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापीका मा. प्रा. सौ.माधुरी नलवडे मॅडम होत्या . यावेळी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यकारी अधिकारी डॉ. जे. व्ही. लेंभे, डॉ. ए. आर. पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. ए. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्यानदूतांचे नियोजन

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी (उद्यानदूत) आदेश जाधव , प्रणव भोसले ,मयुर गाढवे,रोहन बनकर,राम भोईटे आणि गौरव डांगे यांनी या संपूर्ण स्पर्धेचे नेटके नियोजन केले. शालेय शिक्षणाबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व शिक्षकांनी उद्यानदूतांचे कौतुक केले आहे.