Ticker

6/recent/ticker-posts

मन प्रकल्पाचे पाणी सुटले, शेतकरी समाधानी!

 


महेंद्र वानखडे ग्रामीण  प्रतिनिधी   पिंपळखुटा                  

बुलढाणा जिल्ह्यातील शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पामधून पाणी सोडण्यात आल्यामुळे पिंपळखुटा, वाहाळा आणि शहापूर येथील शेतकऱ्यांच्या मनात समाधानाची भावना निर्माण झाली आहे.परिसरातील शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती गहू या पिकाला असून काही शेतकरी कांदा आणि भुईमूग या पिकाची पेरणी डिसेंबर ते जानेवारी महिन्यात करणार आहेत.एकीकडे चांगल्या पिकाची आशा ठेवून शेतकरी अंग मेहनत करीत असून वन्य प्राण्याचा उपद्रव लक्ष्यात घेता शेतकरी दिवस रात्र पिकाचे राखण करण्यासाठी शेतात ठाण मांडून आहेत.