Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड - भव्य रक्तदान शिबिर १२३ रक्तदात्यांनी केले रक्तदान.



 भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

उमरेड यूथ फाऊंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव २०२५ अंतर्गत आज स्थानिक पंडित दीनदयाल उपाध्याय  सभागृह येथे इंडिया पॉवर जिम, रणधीर सिंह भदोरिया महाविद्यालय, ओम साई स्पोर्टिंग क्लब,महिला कला महाविद्यालय,राजाधिराज ढोल ताशा पथक, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उमरेड नगर यांच्या संयुक्तविद्यमाने रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडला.कार्यक्रमाला विकास अधिकारी LIC सतीश तांबेकर यांची प्रायोजकता लाभली.यामध्ये पुरुष व महिला एकूण १२३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रकार्यात हातभार लावला.प्रसंगी महिला महाविद्यालयाचे वासनिक सर,किशोर आदमाने,रितेश राऊत, स्वप्नील ब्रम्हे,सतीश तांबेकर, संस्थापक अनिलकुमार गोविंदानी, संयोजक सचिन कुहीकर,अध्यक्ष दीपक पटले,प्रवीण साठवणे,यांची मंचावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सतीश चकोले यांनी केले प्रास्ताविक दीपक पटले यांनी सदर केली. अनिलकुमार गोविंदानी यांनी मार्गदर्शन केले.तर आभार किशोर आदमाने यांनी मानले. डॉ. हेडगेवार ब्लड बँक नागपूरचे डॉ.रामकृष्ण रणदिवे, प्रवीण पाटील यांचे शर्करा लाभले.यशस्वितेसाठी आशिष वंजारी स्वप्नील गवळी,श्रीकांत बोरकर,उज्ज्वल चिदंबरम, प्रांजल डहाके,पंकज गजभिये,मुकेश गौतम,हितेश गडबोरीकर, तोशीफ शेख, गौरव मिश्रा,अक्षय श्रीखंडे, विशाल बावणे, विश्वास लाडेकर,प्रवीण लाडेकर यांचे सहकार्य लाभले.