प्रतिनिधी- देविदास वायाळ
खळेगाव ता. लोणार येथे आज दि.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिन निमित्त गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा, ज्ञानगंगा आश्रमिय विद्या मंदिर व वसंतराव नाईक विद्यालय या तिन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांची गावात प्रभाफेरी काढून प्रथम ग्रामपंचायत कार्यालया समोर झेंडावंदन करून झेंडा फडकवण्यात आला.
त्यानंतर मराठी पूर्व माध्यमिक शाळेत, ज्ञानगंगा आश्रम शाळेत व नंतर व.ना. वि.हायस्कूल मध्ये झेंडावंदन झाले व सदर शाळेत तालुका स्तरावरील गुणवंत विद्यार्थी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवणारी विध्यार्थीनी कु. तृप्ती केशव नागरे व कु.पूजा संतोष घुगे या विध्यार्थीनींचा मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच,उपसरपंच,पो.पाटील श्री दिलीप वायाळ,ग्रामपंचायत अधिकारी श्री संतोष क्षीरसागर,महसूल अधिकारी श्री प्रकाश डोईफोडे,अंगणवाडी सेविका,सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा आजीमाजी सैनिक व गावातील नागरिक व महिला उपस्थित होते.





Social Plugin