
नाशिक,प्रतिनिधी ,अमन शेख ,
आपला भारत देश हा एक सांस्कृतिक भारत म्हणून ओळखला जातो आणि ही संस्कृती जपणारे लोक म्हणजे भारत देशातील रहिवासी. एकीकडे विज्ञान प्रगतीच्या प्रथावर आहे तर भारतीय संस्कृती ही देखील संपूर्ण जगात नावलौकिक आहे , या संस्कृती चे काळीज म्हणजे सर्व धर्म समभाव , एकोपा , प्रेम, भाईचारा , आदर , सान्मान हे आहे.भाारतातील प्रत्येक जिल्हा्यात , शाहरात गावात प्रस्थापित आपल्या काही रूढी पारंपरा आहेत , जे आजही सणांच्या स्वरूपात , जयंती च्या स्वरूपात, कार्यक्रम म्हणून साजरा केली जातात त्यामुळे च आजही आपल्या भाारत देशात संस्कृती जपलेली आहे . त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील हरीत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाणा या गावात सालाबादप्रमाणे जलाल शहा बाबा दर्गा चे ३३ वे संदल बघायला मिळाले.
दरवर्षी या गावात प्रस्थापित दर्गा चे संदल बघायला मिळते आणि या संदल निमित्त गावात होत असेलेली यात्रोत्सव ही बघण्यासारखी असते यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून येऊन यात्रेसाठी गर्दी जमते त्याचप्रमाणे या संदल मध्ये असलेली गर्दी ही बघण्यासारखी असते या संदर्भामध्ये चादर घेऊन संपूर्ण गावात मिरवणूक केली जाते ती मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात होत असते आणि त्या ढोल ताशांच्या तालावर गावातील प्रत्येक रहिवासी रमत असतो आणि एवढेच नव्हे तर गावकरी सर्वे एकत्र येऊन या कार्यक्रमासाठी प्रतिसाद देतात यावरून गावातील हिंदू मुस्लिम एकोप्याची भावना दिसून येते आणि यादरम्यान मिरवणुकीत प्रत्येक नागरिक दर्शनासाठी येतात हिंदू असो वा मुस्लिम या मिरवणुकीचा एक सहभाग असतो .
एकीकडे वेगळे राजकारण तर हिंदू मुस्लिम लढाई दुसरीकडे हे हिंदू मुस्लिम समभाव आणि प्रेम बघून जणू डोळ्यात अश्रू भारतात असे बघण्यासारखे दृश्य या संदलचे असते या संदनमध्ये मिरवणूक झाल्यानंतर जलाल शहा बाबा यांच्या समाधीवर चादर टाकली जाते , तसेच तेथे विधीनुसार काही वाचन होते तसेच कुराण मधील काही वाचन केले जाते हे वाचन गावातील प्रमुख आणि मुस्लिम समाजाचे धर्मगुरू म्हणून उपस्थित असलेले हाजी सुफी मोहम्मद इस्माईल बाबा उर्फ पीर साहब यांनी केले ,
यांनी गावाच्या विकासासाठी गावातील प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी गावाच्या संरक्षणासाठी दुवा मागितली आणि त्यांच्या हस्ते गावातील काही प्रमुख उपस्थितींचे सत्कार करण्यात आले . या कार्यक्रमासाठी गेल्या आठवड्याभरापासून खूप लोकांनी मेहनत घेतलेली आहे त्यामध्ये दर्गा कमिटीचे मेंबर जसे अध्यक्ष अखिल पठाण , उपाध्यक्ष अनिस पठाण , सरचिटणीस मोसिन काजी , खजिनदार वाजीद शेख , आणि सदस्य म्हणून तबरेज शहा, अन्वर शहा ,मुस्ताक पठाण ,जावेद काझी , जुनेद पठाण , सलमान शहा, शाकुर शहा , इमरान शहा ,शाबीर शहा .
तसेच कार्यभार म्हणून आणि दर्गाची सजावट आणि इतर कार्य साकिब पठाण ,अफराज पठाण, समीर पठाण ,शहानवाज पठाण ,शादाब मणियार यांनी बघितले . या संदल ची सुरुवात पठाण यांच्या मुख्य घरापासून सुरू झाली आणि त्याचा शेवट जलालच्या बाबा यांच्या समाधीवर झाला. आणि याच प्रमाणे या संदल चे आयोजन दरवर्षी होत रहावी हीच या गावकऱ्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे , कारण हा एक दिवस सामाजिक एकोप्याचा ऐक्य म्हणून ओळखला जातो आणि हीच परंपरा कायम जपण्यासाठी गावातील नागरिक नेहमीच तत्पर आहेत आणि असतील .




Social Plugin