.प्रतिनिधी -देविदास वायाळ पाटील 

 कुंभेफळ येथे आज 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला येथील प्राथमिक शाळेमध्ये छोट्या मुलांकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.भाषण, नृत्य,लेझीम,असे अनेक कार्यक्रम सादर झाले त्यामध्ये अगदी मोहित करणारे सुंदर लेझीम नृत्य चिमुकल्यांनी सादर करून सर्व गावकऱ्यांचे मन मोहित करून घेतले व गावातील छोट्याशा शाळेची शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,शाळा समिती अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य मंडळी व सर्व पालक मंडळी तथा गावकरी मंडळी यांनी हजर राहून शाळेतील चिमुकल्यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.