पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करून पहिले पुष्प गुंफले . बुधच्या लोकनियुत्क सरपंच सुजाता बोराटे ,सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, उपसरपंच व शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष अभयसिंह राजेघाटगे, सदस्य दयानंद जगदाळे, किशोर मेळावणे, महेश बोबडे, मनोज फडतरे व विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन केले . प्राचार्य अंकुश भांगरे व विद्यालयातील शिक्षक नाना दडस , विशाल नाळे, तानाजी पाटील, संजय माने व चंदा वाईकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले .
विद्यालयातील विद्यार्थी कु . रिया जगदाळे ,अर्णव फुरकुटे ,स्वराली जाधव यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यालयातील जेष्ठ शिक्षक तानाजी पाटील यांनी स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू व विवेकानंदाच्या बालपणाच्या आठवणी मनोगता मध्ये सांगितल्या .तसेच शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेमध्ये माझ्या बंधू आणि भगिनींनो यामधुन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले असे मनोगतामध्ये सांगितले . तसेच सरपंच सुजाता बोराटे यांनी सप्तांमध्ये विविध उपक्रम आयोजित केलेले आहे त्यासाठी शुभेच्छा दिल्या . सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले . अभयसिंह राजेघाटगे यांनी युवकांसाठी स्वामींजीनी दिलेला संदेश अंमलात आणावा व आपले जीवन राष्ट्रासाठी समर्पित करण्यासाठी प्रयत्न करावेत . तसेच व्यसनाधीनतापासून दूर राहावे असा मोलाच संदेश युवक दिनाच्या निमित्तने दिला ..तसेच प्राचार्य अंकुश भांगरे सर यांनी स्वामी विवेकानंद यांचे नाव संस्थेला डॉ बापूजी साळुंखे यांनी देऊन त्यांच्या कार्याचा आढावा संपूर्ण महाराष्ट्र, देशभर संस्थेच्या माध्यमातून प्रचार ,प्रसार केला जात आहे .12 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा ,उपक्रम आयोजित केले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कलागुण विकसित करावे असे आव्हान केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान सरवदे यांनी केले . तर आभार संजय माने यांनी मानले .स्वामी विवेकानंद यांची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरामध्ये बुध मधून फेरी काढून साजरी करण्यात आली .यावेळी विद्यार्थी यांनी स्वामी विवेकानंद व संस्थेच्या जयघोषाने बुध परिसर दणाणून सोडला .या प्रभात फेरीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध समाजसुधारकाच्या वेशभूषा साकारल्या होत्या . अतिशय उत्साहाच्या वातावरणात विवेकानंद साप्ताहाचा प्रारंभ सुरू झाला यावेळी विद्यालयाती प्राध्यापक , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते .





Social Plugin