Ticker

6/recent/ticker-posts

राजुर येथे बसस्थानक परिसरात राहत्या घरी अवैध वेश्याव्यवसाय हसनाबाद पोलीसांचा छापा दोघे जण पोलीसांच्या ताब्यात.



भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील  ।

 भोकरदन तालुक्यातील राजुर येथे बसस्थानक परिसरात राहणाऱ्या पती आणि पत्नी आपल्या राहत्या घरीच बाहेरच्या महीला आणुन त्यांच्या कडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे गुप्त खबर हसनाबाद पोलीसांना मिळताच  छापा टाकुनी पती पत्नी ला पोलीसांनी अटक केली.याबाबत सविस्तर माहिती अशी की राजुरा येथील रहिवासी गणपत सेठी आणि गितांजली सेठी हे पती आणि पत्नी आपल्या राहत्या घरात बाहेरुन महीला आणुन त्यांच्या घरात च महीला कडुन वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे गुप्त माहिती हसनाबाद पोलीसांना मिळताच हसनाबाद पोलीसांनी ग्राहक पाठवून खात्री करून छापा टाकला 5400 रुपये दोन मोबाईल फोन 60,000 रुपये  किंमतीचे जप्त केले.  एकुण  65400 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हसनाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी  पोलीस अधिकारी संजय अहिरे ,महीला पोलिस उपनिरीक्षक सौ अर्चना भोसले , पोलिस अंमलदार नरहरी खार्डे, रामेश्वर सिन्नकर ,दिपक सोनुने , नारायण  चरावडे,प्रकाश बोर्डे यांच्या  पथकाने  भोकरदन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ नितिन कटेकर, जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय नोपाणी याच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली हसनाबाद पोलीसांनी ही कारवाई केली गणपत सेठी आणि गितांजली सेठी या पती आणि पत्नी विरोधात अवैध कुंटणखाना चालविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.