Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड - उमरेड येथे नगराध्यक्ष–नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

 



भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

उमरेड येथे नगराध्यक्ष - नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेचा भव्य शुभारंभ संपन्न स्वनपूर्ती क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.नगराध्यक्ष–नगरसेवक चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रतिस्पर्धी मोठया संख्येने भाग घेतला तसेच शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड नगर परिषद चे नगराध्यक्ष मा. सौ प्राजक्ताताई रोहित कारु यांची उपस्थिती लाभली.

यावेळी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाले की, खेळामुळे युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. अशा स्पर्धांमुळे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळते. उद्घाटन प्रसंगी आयोजक मंडळ, मान्यवर पाहुणे, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ही स्पर्धा उमरेड शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरत असून, आगामी दिवसांत उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळणार आहेत.