गोपाल काळे यांचे मार्गदर्शन ठरले मोलाचे
मालेगाव प्रतिनिधी :-जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : सुमारे १२ ते १३ दिवसांपूर्वी रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द व मालेगाव तालुक्यातील दुधाळा परिसरात कांदा पिकावर सड रोग व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. अशा परिस्थितीत काळे ऍग्रो ट्रेडर्स, शिरपूर जैनचे संचालक तथा युवा उद्योजक गोपाल विलास काळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत योग्य मार्गदर्शन केले. वाघी खुर्द (ता. रिसोड) येथील शेतकरी विनोद दत्तराव गीऱ्हे, शिवाजी खेकाळे, बालाजी शेवाळे, नारायण खेकाळे, बबन खेकाळे, राजू डोंगरे, जगन्नाथ गोडघाशी आदि शेतकऱ्यांच्या कांदा प्लॉटची पाहणी करून गोपाल काळे यांनी सड व करपा रोगावर प्रभावी औषधी फवारणी व ड्रिचिंगबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सुचवलेल्या उपाययोजना अवलंबल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत कांद्यावरील सड व करपा रोग जवळपास पूर्णतः आटोक्यात आला. याबाबत संबंधित शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.
तसेच दुधाळा (ता. मालेगाव) येथील बबन काळे, मदन काळे, नारायण काळे, भगवान काळे, भरत काळे, केशव काळे या शेतकऱ्यांच्या शेतातही प्रत्यक्ष भेट देऊन गोपाल काळे यांनी कांदा पिकाची पाहणी केली. योग्य औषधी फवारणी व ड्रिचिंगचे मार्गदर्शन केल्यानंतर येथेही आठ दिवसांत रोग नियंत्रणात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याशिवाय कांदा पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी गोपाल काळे यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले. कांद्यावर मधमाशांची संख्या वाढून परागीभवन सुधारावे यासाठी नैसर्गिक पद्धती सुचवण्यात आल्या. कांदा पिकाच्या आजूबाजूला विविध जातींची फुले लागवड करणे, तसेच शेताच्या कडेला मोहरी, सोप, धणे यांचे बी पेरण्याचा सल्ला देण्यात आला. यामुळे मधमाशा आकर्षित होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. थेट शेताच्या बांधावर जाऊन कष्टकरी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, व्यावहारिक व नैसर्गिक मार्गदर्शन केल्याबद्दल गोपाल विलास काळे यांचे शेतकरी वर्गातून कौतुक होत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.





Social Plugin