(ओंकार पुरी प्रतिनिधी)
रिसोड(03 जानेवारी 2025 वाशिम): स्थानिक उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कुलकर्णी होते, तर प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. नूतन भराड उपस्थित होत्या.
ॲड. भराड यांनी "सावित्रीबाई फुले ही केवळ व्यक्ती नसून एक विचारधारा आहे," असे प्रतिपादन करत त्यांच्या सत्यशोधक कार्यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी सावित्रीबाईंच्या विचारांमुळेच स्त्रिया आज उच्च पदावर पोहचल्याचे नमूद केले.
यानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत वैशाली पाईकराव हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रा. डॉ. खेडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. काळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.





Social Plugin