Ticker

6/recent/ticker-posts

श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठू शकता:पुसेगावचे सपोनी संदीप पोमण



बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

शिक्षणाबरोबरच श्रमाला ही किती महत्व आहे याची जाणीव महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्रमसंस्कार शिबिरातच होतअसते. मग ते श्रम अभ्यासातील, शेतातील,समाजकारणातील , घरगुती व्यवसायातील किंवा स्पर्धापरीक्षेतील यशाबाबत असतील. या एन एन एस शिबिरात मिळणारा सांघिक एकोपा, जिद्द, चिकाटी,आत्मविश्वास, मित्रप्रेम आणि सात आठ दिवस सर्वांबरोबर केलेल्या प्रचंड श्रमाच्या जोरावर तुम्ही नक्कीच कुठल्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकता असे प्रतिपादन पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी केले.

            खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत धारपुडी या गावात आयोजित केलेल्या श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी सपोनी संदीप पोमण बोलत होते. यावेळी प्राचार्य प्रोफेसर डॉ जे पी कदम, सरपंच आप्पासाहेब पवार, उपसरपंच सौ प्राजक्ता जगताप सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी ,पोलिस पाटील,सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ,कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा के बी जाधव उपस्थित होते.

       आठ दिवस चालणाऱ्या या शिबिरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ बी बी राठोड व प्रा एम के इदे यांनी सांगितले. प्रा सौ पी बी कांबळे यांनी सुत्रसंचलन केले.