Ticker

6/recent/ticker-posts

टाकळी जिल्हा परिषद गटात गाठी भेटीवर राजदेव दांपत्याचा धडाका .

 


पारनेर प्रतिनिधी 

         टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार सोनियाताई राजदेव आणि रविंद्र राजदेव यांचा गाठीभेटी वर जोर वाढवला असून संपूर्ण गट दोन वेळा ह्या दांपत्याने पिंजून काढला असून त्यांची उमेदवारी अंतिम असल्याचे कालच्या कार्यक्रमात राणीताई लंके यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे.

            काल मुद्दामहून रविंद्र राजदेव यांनी पारनेरकर मुंबई येथे जाऊन कामोठे ,कळंबोली ,करंजाडे ,पनवेल , खांदा कॉलनी ,बेलापूर , नेरुळ, सानपाडा, उलवे, वाशी येथे जाऊन पारनेर कर मुंबईस्थितांच्या भेटी घेतल्या आणि सर्वच मुंबईकरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेछ्या देऊन तुमच्यापाठीमागे ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले.

       आम्ही मुंबईला जरी असलो तरी रविंद्र राजदेव यांना फोन जरी केला आणि काही अडचण असल्यास मग ती पोलिस स्टेशन असो ,तहसील ची असो किंवा कोणत्याही विभागाची असो ते लगेच अडचण सोडविण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच प्रतिनिधीची गरज आमच्या गटाला आहे मंजे सर्वसामान्य माणसाला अडचण आल्यास सर्वसामान्य माणूसच प्रश्न सोडू शकतो ,गरीब माणसाला अडचण आल्यास मोठ्यांची दारे बंद असतात अशा लोकांनी प्रतिक्रिया दिल्या.