बिलोली प्रतिनिधी - राजेश अमेटवार
बिलोली :लहान असो किंवा मोठे सर्वांशी प्रेमाने बोलणे,वागणे तसेच माणसाच्या जन्माला येऊन माणूस मनून कसा जगला पाहिजे.आणि लोकांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम,आदर, विश्वास निर्माण करणारे एक सामान्य कुटुंबात जन्मास आलेले व कोणत्याही क्षेत्रात जीमेदारी खांद्यावर घेऊन एकनिष्ठपणे कामगिरी करून तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविणारे तसेच कुठल्याही शासकीय कार्यालयात काम पडल्यास ते कुठल्याही पक्षाचा जातीचा, धर्माचा, वेळेचा विचार न करता तत्पर उपस्थित राहून ते प्रश्न सोडवतात. त्यांच्या या कामगिरीमुळे व लोकांमध्ये त्यांच्या बद्दल असणारा जिव्हाळा पाहून त्यांची पक्ष प्रमुख ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी श्री शंकर महाजन यांच्यावर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.त्यांची जिल्यात चांगलीच पकड निर्माण आहे तसेच त्यांच्या मागे युवा वर्ग देखील भक्कम उभा आहे. ते कनिष्ठ स्तरावरूनपक्षाशी निष्ठा राखत कार्य करणारे खरे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्याची ओळख हीतालुक्यातील एक सक्रिय कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळणार कार्यकर्ता म्हणून आहे.
तालुक्यातील वंचीत बहुजन आघाडी पक्षाचे अनेक नेते इतर पक्षात गेले असतानाही महाजन यांनी पक्षाची निष्ठा कायम राखत काम केले. दोन दिवसाखाली झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नांदेड मध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाचे 5 नगरसेवक निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.या नवीन जिल्हाध्यक्ष पदाची जीमेदारी खांद्यावर देण्यात आल्याने या भागातील लोकांना आनंदोस्तव मनून शंकर महाजन साहेबांचे सत्कार करण्यात आले. खतगाव येथील समाज मंदिर परिसरात मोठया उत्साहात पहिल्यांदा गौतम बुद्ध यांच्या स्मुर्तीस दीप लावून वंदन करण्यात आले. नंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुलवृष्टी करून त्यांच्या पुढे नतमस्तक होऊन पुढील कार्यक्रम करण्यात आले. यावेळी महाजन साहेबांसोबत असलेले शंकर बोडके, राजू आमेटवार,तालुका सदस्य तसेच पत्रकार मारोती एडकेवार यांचे देखील सत्कार केले. यावेळी गावातील उपस्थित संतोष पाटील, माधव दाणेदार, नवनाथ हंदोरे, शंकर मुंडकर, नवनाथ मंडगे, मोहन बुद्धेवार, लालू बुद्धेवार, संजय बुद्धेवार, विठ्ठल बुद्धेवार,गंगाधर बुद्धेवार राजीव बुद्धेवार,चंद्रकांत वाघमारे, परमेश्वर वाघमारे, अनिल वाघमारे, आकाश वाघमारे,संदीप वाघमारे,संतोष वाघमारे, आदर्श कांबळे,सोमेश काळे,सुनील बुद्धेवार, प्रवीण आडेकर,ऋतिक भंडारे,जय भीम आडेकर,सचिन भंडारे आणि आंबेडकर चलवळीतील युवा वर्ग उपस्थित होता. आणि तसेच गावातील महिला वर्ग सुद्धा मोठया उत्तस्तुकामध्ये साहेबांचे मनोगत ऐकले. या सर्व कार्यकर्माचे आयोजन अनिल बुद्धेवार यांनी केले. या नंतर शंकर महाजन यांनी त्यांच्या मनोगतात आपण दिलेले प्रेम असेच माझ्या पाठीशी असुद्या आणि मी देखील तुमच्या कुठल्याही काळात तुमच्या सोबत आहे. आणि साहेबांनी दिलेली जबाबदारी आपण सर्वानी मिळून पार पाडू असे प्रतिक्रिया देऊन आपले बोलणे थांबले आणि शेवटी आभार प्रदर्शन अनिल यांनी केले.





Social Plugin