Ticker

6/recent/ticker-posts

सोमठाणा ग्रामपंचायत सरपंचांनी जपली सामाजिक बांधिलकी.



ग्रामीण प्रतिनिधी दत्ता बाळापुरकर.                               

सोमठाणा येथील सरपंच प्रतिनिधी प्रियंका ज्ञानेश्वर गोदेवाड यांनी यांच्या मुलीच्या प्रथम वाढदिवसानिमित्त इतर व्यर्थ व्यर्थ खर्च टाळून व सामाजिक गरज लक्षात घेऊन इतर काही खर्च न करता सोमठाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना 129 स्कूल बॅग व सोमठाणा तांडा येथील शाळेत 21 स्कूल बॅग वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून व शिक्षणाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले त्यांचे अंगीची ही शिक्षणाची आवड ही दिसते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेळके सर व सर्व स्टॉप यांनी त्यांचे आभार मानले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष ओम प्रकाश बिंगेवाड व सदस्य दत्ता बाळापुरकर सरपंच यांचे पती ज्ञानेश्वर गोदेवाड हे उपस्थित होते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी त्यांचे आभार मानून अभिनंदन व्यक्त केले