वार्ताहर लक्की राठोड मांडवी नांदेड
दिनांक 16 जानेवारी 2025 बदुजी नगर मांडवी येथील असलेली महावितरणची विद्युत डीपी गेल्या अनेक दिवसांपासून उघड्या अवस्थेत पडली आहे. या डीपीचे दरवाजे तुटलेले असून वीजप्रवाहाच्या जिवंत तारा बाहेर अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिक भयभीत झाले आहेत.या भागात नागरिकांची आणि लहान मुलांची मोठी वर्दळ असते. डीपीचे संरक्षण कुंपण गायब झाले असून विद्युत तारा जमिनीच्या अगदी जवळ आल्या आहेत. पावसाळी वातावरणात किंवा रात्रीच्या वेळी या उघड्या तारांचा अंदाज न आल्यास मोठा अनर्थ घडू शकतो. स्थानिक नागरिकांनी अनेकदा तोंडी आणि लेखी तक्रारी करूनही महावितरण विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.





Social Plugin