Ticker

6/recent/ticker-posts

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयाचे 'मांगवाडी' येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजित



 (प्रतिनिधी :ओंकार पुरी ) 

रिसोड: स्थानिक उत्तमचंद बगडिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाचे विशेष श्रमसंस्कार शिबीर १६ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान दत्तकग्राम मांगवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन रिसोडचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विनोद कुलकर्णी असतील. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एम.एन. गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात परिसर स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान, कृषी योजना मार्गदर्शन, जलसंधारण आणि प्रभात फेरी यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील. 'युवकांचा ध्यास, ग्रामविकास' या उक्तीनुसार स्वयंसेवक श्रमदानातून गावचा कायापालट करणार आहेत.