Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शंकर महाजन यांची निवड



देगलूर प्रतिनिधी ) 

बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते ग्रा.प सदस्य सतत गोरगरीबांच्या प्रक्ष्ना साठी लढनारा व सैदव लोकानसाठी तत्पर असनारे गरीबांचे कैवारी अशी ओळख असलेले अशी ओळख असलेली डॅशीग वैक्तीमत्व श्री. शंकर गंगाधर महाजन यांची गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.. यासंबंधीचे अधिकृत पत्र त्यांना देण्यात आले आहे.

 काल प्रदेश वंचित बहुजन आघाडीने नांदेड दक्षिण जिल्ह्याची कार्यकारणी नुकतीच जाहीर केली ज्यात बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रहिवासी तथा ग्रामपंचायत सदस्य शंकर गंगाधर महाजन यांची वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड केल्याचे पत्र दिले. यापूर्वी महाजन हे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती. या निवडीमुळे वंचित आणि बाळासाहेबां सोबत गेल्या पाच वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या महाजन यांना निष्ठेचे फळ मिळाले. जिल्हाध्यक्षपदी निवड करून पक्षानेही महाजन यांचा सन्मान केला. नांदेड दक्षिणच्या या जिल्हा कार्यकारणीत महाजन यांच्यासह रवी पंडित ( महासचिव ), गणपत सवईसोनकांबळे, विनायक गजभारे, विद्यानंद पवळे, अरुण भद्रे, पवन कांबळे ( उपाध्यक्ष ), रंगनाथ गजले ( सचिव ), देगलूर चे माजी नगरसेवक सुशील कुमार देगलूरकर, संजय टिके ( संघटक ), डॉ.रामचंद्र वनंजे, भगवानराव हनमंते ( सल्लागार ) अँड.जयपाल ढवळे ( कायदेशीर सल्लागार ), नामदेव पांचाळ ( प्रसिद्धीप्रमुख ), गौतम डुमणे, प्रकाश कोल्हे, रत्नपाल माने आदींची या कार्यकारणीत निवड करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाध्यक्षपदी निवड झालेल्या महाजन यांचे माजी जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.