प्रतिनिधी:- लक्ष्मण बिल्हारे
आज १२ जानेवारी. म्हणजेच, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या, हिंदवी स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती.
जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांचे वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई यांनी त्यांच्यावर बालपणापासूनच शौर्याचे आणि न्यायाचे संस्कार केले. केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर बुद्धीच्या चातुर्यानेही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
त्या काळी रयतेवर होत असलेला अन्याय पाहून जिजाऊंचे मन विषण्ण व्हायचे. पण त्यांनी केवळ साश्रू नयनांनी अन्याय पाहिला नाही, तर तो अन्याय मुळापासून उपटून टाकण्यासाठी आपल्या शिवबांना तयार केले. त्यांनी शिवरायांना लहानपणी रामायण, महाभारतातील शौर्यकथा सांगून त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ठिणगी पेटवली.
संस्कारांची खाण: त्यांनी शिवरायांना केवळ युद्धकलाच शिकवली नाही, तर न्याय, नीती आणि स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण दिली.
स्वराज्याची प्रेरणा: शहाजीराजे बंगळुरूला असताना, जिजाऊंनी पुण्याची जहागिरी सांभाळली आणि उजाड झालेल्या पुण्याचा कायापालट केला.
प्रशासक: शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याचा कारभार अतिशय कुशलतेने पाहणाऱ्या त्या एक आदर्श प्रशासक होत्या.माँसाहेबांनी शिवरायांना केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही, तर न्यायाने राज्य चालवण्याचा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे 'संस्कार' दिले. आजच्या पिढीसाठी माँसाहेब हे अढळ प्रेरणास्थान आहेत.
आपणही तो आदर्श घ्यावा तसेच१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे जन्म झालेले नरेंद्रनाथ दत्त पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले गेले. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षीच १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले होते. त्यानंतर जगाचे लक्ष त्यांनी वेधले. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. असे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.लक्ष्मण बिल्हारे म्हणाले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुभाष खवल सर श्री. प्रविण वावरे सर, श्री.विलास ईरले सर, श्री.राजाराम केवारे सर, श्री.तुकाराम राजबिंडे सर तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.सुनिल सुरुंग,सदस्य बाबासाहेब सुरुंग, तुळशीदास बिल्हारे,ज्ञानेश्वर (माऊली)डव्हारे, शिवाजी सुरुंग,महादेव डव्हारे, दत्ता भाऊ अंभुरे,किशोर सुरुंग, वैजनाथ वाघमारे, भास्कर पाईकराव, परमेश्वर बिल्हारे,तुकाराम मिंड,भरत डव्हारे, विश्वनाथ पाईकराव,मनेश वटाने,सुशांत काकडे,सोपान डव्हारे,विजय गिरी, बालासाहेब सुरुंग,अमोल पाईकराव,शाम ठाकरे आदी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin