बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयाचा वेटणे येथे सुरू असलेला श्रमसंस्कार शिबिर आयोजित व्याख्यानमालेत "राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान " या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा समन्वय प्रा . कोंडीबा शिदे बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.जी कुंभार आणि कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.एच.जी.निमसे, प्रा.डाॅ.अनिल दडस,प्रा.एम.एस.वाघ,प्रा.एम.एन.आवळे,प्रा.डाॅ.ए.टी.कांबळे इ.उपस्थित होते.
प्रा.शिंदे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, "बदललेला काळ, विद्यार्थ्यांचे संस्कार आणि सामाजिक जबाबदारी या सर्व बाबी एकत्रितपणे चांगले नागरिक बनतात .शिबिरातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यांना चैतन्य मिळते आणि ते विविध जीवन कौशल्यांमध्ये निपुण होतात. त्यांनी विद्यार्थ्यांना शिबिराच्या माध्यमातून आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी प्रेरित केले.आत्मज्ञान आणि जाणीव या दोन्ही गोष्टी जीवनात महत्त्वाच्या असतात. योग्य संस्कार आणि मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मक बनते.असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर प्रा.डॉ.अनिल दडस यांचे मार्गदर्शन देखील खूप प्रेरणादायक ठरले. "तरुणांची व्याख्या फक्त शारीरिक वयावर आधारित नसून, त्यांच्या मानसिक व भावनिक तयारीवर आधारित असली पाहिजे," असे ते म्हणाले. आजच्या तरुणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत.त्या संधीचा फायदा घेऊन आपले व्यक्तिमत्त्व आणि करिअर साधता येते.शिबिराच्या उद्दिष्टांविषयी बोलताना डॉ. दडस यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या परंपरा आणि रूढींचे महत्त्व सांगितले.समाजात चांगली परंपरा जोपासली पाहिजे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी यापुढे चांगले विचार, कार्य आणि शिस्त शिकणे आवश्यक आहे.त्याचबरोबर, त्यांच्यामध्ये समाजहिताची भावना असावी असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबद्दल बोलताना सांगितले की, "शिबिरांच्या माध्यमातून त्यांना नेतृत्वाचे, संवाद कौशल्याचे आणि इतर सामाजिक कौशल्यांचे महत्त्व शिकवले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास आणि मनोबल वृद्धीला जात असते."
अशा प्रकारे शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांना भविष्यातील विविध आव्हानांचा सामना करण्याची तयारी दाखवली पाहिजे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.पायल इंजे यांनी केले.सूत्रसंचालन कु.अनुजा मदने यांनी केले.तर आभार कु.गौरी यांनी मानले कार्यक्रमासाठी श्री.विकास खाडे, शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin