Ticker

6/recent/ticker-posts

●खरब खंडगांवात पाणपोई चे लोकार्पण .



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

●मुखेड तालुक्यातील ग्राम खरब खंडगांव येथे श्री क्षेत्र ओंकारेश्वर जागृत देवस्थान याञा महोत्सवानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा आणि भुमिपूञांचा गौरव सोहळा आयोजित करून पाणपोईचे मंगळवार दि.२७ रोजी सामुहिक लोकार्पण करण्यात आले.

या अध्यात्मिक सत्संग सोहळ्यानिमित्त येणाऱ्या सद्भभक्त भाविकांना,गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची  सुविधा व्हावी,यासाठी येथील उपसरपंच प्रतिनिधी परमेश्वर तुळशीराम तरटे व मिञ परिवाराच्या वतीने ही पाणपोई सुरू करण्यात आली.यावेळी परमेश्वर तरटे, सौ.सुमिञा तरटे,मिञ परिवार, प्रतिष्ठित गावकरी यांची उपस्थिती होती.