महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी उध्दव कवळे
नांदेड/हदगाव हिमायतनगर तालुक्यातील वायपना बु येथे,आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांच्या स्थानिक निधीतून 15 लक्ष रुपयाचे सी सी रस्त्याचे काल भूमिपूजन झाले. गावातील बहुजन समाजातील स्मशान भूमी कडे जाण्यासाठी रस्त्याची खूप दुर्मिळ दूरदशा झाली होती आणि कार्यकर्त्यांनी साहेबांच्या कानावर घालताच साहेबांनी ते मंजूर सुद्धा करून आणले.आणी या कामाचे भूमिपूजन गावातील ज्येष्ठ नागरिक पुंजारामजी पाटील दुगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील महायुतीचे सर्व कार्यकर्ते व गावातील सर्वच गावकरी मंडळी उपस्थित होते गावासाठी आमदार साहेबांनी रस्ता दिल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे जाहीर आभार मानले.
.jpg)




Social Plugin