Ticker

6/recent/ticker-posts

माणिकखांब येथे जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती साजरी,



प्रतिनिधी:शिवनाथ घोटकर.इगतपुरी,


तालुक्यातील माणिकखांब गावात गेल्या सात वर्षांपासून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासातुन शिव जयंती साजरी केली जाते. यावर्षी देखील १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्हा परिषद शाळा लहान गट व मोठा गट, तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, बुद्धिबळ , स्लो सायकल, धावणे, वेशभूषा, चित्र कला,व रांगोळी या स्पर्धाचे आयोजन करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देण्याचे काम केले जाते.या स्पर्धानसाठी यजमान म्हणून श्री नरेंद्र भोईर, श्री धनराज चव्हाण, श्री हरिष चव्हाण, (माजी सरपंच) डॉ. गोपाळ चव्हाण,श्री वासुदेव चव्हाण, श्री भोलेनाथ चव्हाण ( आगरी समाज सचिव), श्री शाम चव्हाण ( माजी सरपंच),श्री विनोद चव्हाण (माजी उपसरपंच),श्री विष्णू चव्हाण (माजी सभापती),श्री सोपान चव्हाण, श्री तुकाराम चव्हाण, ऍड.सोपान चव्हाण, पहिलवान गोटीराम चव्हाण, डॉ. हिरामण चव्हाण, इंजि.जितेंद्र चव्हाण, इंजि.संदीप चव्हाण, श्री ज्ञानेश्वर चव्हाण, श्री हिरामण चव्हाण (माजी उपसरपंच)श्री शंकर चव्हाण, ऍड. अशोक पगारे, ऍड राजेंद्र पगारे श्री तुकेश चव्हाणश्री रोहिदास चव्हाण श्री संजय माळी श्री विनोद चव्हाण (माजी उपसरपंच)श्री वासुदेव चव्हाणश्री मनोहर आडॊळे (स्टेशन मास्टर)श्री ज्ञानेशवर चव्हाण, इंजि. जितेंद्र चव्हाण, श्री सुदाम लायरे, इंजि. शाम चव्हाण या सर्वांचे सहकार्य लाभले.तसेच माजी सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, शिव सेना शाखा प्रमुख श्री भारत भटाटे, श्री ज्ञानेश्वर चव्हाण व ग्रामस्थ मोठे संख्येने उपस्थित होते. ज्ञानगंगा शाळेचे मुख्याध्यपक श्री पाखले सर, श्री आहेर सर व मराठी शाळेचे मुख्याध्यपक श्री येशी सर यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. या स्पर्धेचे आयोजन श्री नरेंद्र भोईर, श्री धनराज चव्हाण व प्रा गोपाळ लायरे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दोन्हीही शाळेच्या शिक्षक वृंदाचे सहकार्य लाभले.